मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी)
सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) या केंद्र शासनाच्या स्वयंरोजगार प्रोत्साहन योजनेच्या मार्यादित उद्दिष्ठ, होतकरु युवक युवतींचे स्वयंरोजगार उभारणीसाठी प्राप्त होणारे मोठया प्रमाणातील प्रस्ताव विचारात घेऊन तसेच राज्याचे नैसर्गिक साधन संपत्ती व अंगभूत क्षमता विचारात घेऊन राज्याची महत्वाकांक्षी अशी स्वतंत्र ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ ही योजना सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षापासून राज्यात कार्यान्वित करण्यासाठी शासनाच्या नविन औद्योगिक धोरण २०१९ मुद्दा क्रमांक ५ (II)´É ९.२ नुसार जाहिर केली आहे.
योजनेच्या स्तर :- ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ ही योजना राज्यस्तरावर उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय, मुंबई हे योजनेचे प्रमुख अंमलबजावणी संस्था म्हणून कार्यवाही करतील.
योजनेचे उद्दिष्ट :- राज्यातील युवक युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून सुलभतेने स्थापित होऊन पुढील पाच वर्षात सुमारे १ लाख सूक्ष्म, लघु उपक्रम स्थापित होणे व त्या माध्यमातून एकूण १० लाख रोजगार संधी राज्यात उपलब्ध होणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रथम वर्ष २०१९-२०२० करिता एकूण १० हजार लाभार्थी घटक उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.
(अ) योजने अंतर्गत उद्योगाची व्याख्या :खादी आयोगाने ठरविलेल्या नकारात्मक उद्योगाव्यतिरिक्त सर्व उद्योग या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.
(क)लाभार्थीची पात्रता :
१. १८ वर्ष पूर्ण अधिकत्तम मर्यादा ४५ वर्षे वैयक्तिक व्यक्ती लाभार्थी राहिल.
२. वैयक्तिक मालकी, भागीदारी, वित्तीय संस्थानी मान्यता दिलेले बचत गट.
३. रु.१० लाखावरील प्रकल्पासाठी ७ वी पास व रु.२५ लाखावरील प्रकल्पासाठी १० वी पास.
४. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस कार्यक्रमाचा लाभ घेता येईल. कुटुंबाची व्याख्या ही पती पत्नी अशी असेल.
५. अर्जदार यांने केंद्र अथवा राज्य शासनाच्या योजनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
६. अर्ज करण्याची पध्दत :- अर्ज ऑनलाईन कार्यप्रणालीव्दारे – सीएमईजीपी ई-पोर्टलवर
(ड)सी एम ई जी पी अंतर्गत अर्थसहाय्याचे वर्गिकरण : या योजने अंतर्गत उत्पादन उद्योगासाठी ५० लाख मर्यादा व सेवा उद्योगासाठी १० लाख कर्ज सहाय्य मर्यादा आहे. खाली दर्शविण्यांत आल्याप्रमाणे अर्थसहाय्य वर्गवारी आहे. या योजने अंतर्गत देण्यांत येणा-या मार्जिन मनीचा स्तर पुढील प्रमाणे असेल.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्यामार्फत ग्रामीण भागात व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या मार्फत शहरी व ग्रामीण भागात स्वतंत्रपणे राबविण्यात येत आहे
CMEGP योजने अंतर्गत अनुदान cmegp scheme subsidy details
|
|
|
|
|
|
|
|
|
CMEGP योजनेसाठी पात्रता निकष cmegp scheme eligibility
- महाराष्ट्रातील कोणताही नागरिक असावा ज्याचे वय १८ ते ४५ वर्ष आहे. विशेष प्रवर्गासाठी पाच वर्ष वयोमर्यादा शिथील आहे म्हणजेच त्यांच्यासाठी वय वर्ष ५० पर्यंत या योजनेअंतर्गत पात्र आहेत.
- cmegp scheme हि रोजगार निर्मिती योजना आहे त्यामुळे यासाठी कुठलीही उत्पन्नाची अट नाही.
- वैयक्तिक लाभार्थी, प्रोपरायटरशिप, पार्टनरशिप किंवा बचत गट या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- रु. १० लाखांपर्यंतच्या प्रकल्पासाठी शिक्षणाची कोणतीही अट नाही परंतु रु १० लाख ते रु २५ लाख पर्यंतच्या प्रकल्पासाठी लाभार्थी किमान सातवी पास असावा आणि रु. २५ लाख रुपयांपेक्षा अधिकच्या प्रकल्पासाठी लाभार्थी किमान दहावी पास असावा.
- कुटुंबामधील फक्त एकाच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल.
- तसेच इतर कुठल्याही योजनेअंतर्गत जर आपण अगोदर अनुदानाचा लाभ घेतला असेल तरीही आपण या योजनेसह पात्र नाहीत.
प्रकल्प खर्चाची मर्यादा (Eligible Project Cost for CMEGP Scheme)
|
|
|
|
सेवा क्षेत्रातील प्रकल्प (रु १० लाखापर्यंत) Service Sector Project List
- ई सेवा केंद्र
- झेरॉक्स सेंटर
- टायपिंग डि टी पी जॉब वर्क
- टी स्टॉल
- मेस
- टेलरिंग
- पिठाची चक्की
- मिरची कांडप
- फोटोग्राफी
- सर्व्हिसिंग सेंटर
- मोबाइल रिपेअर
- इंजिनीरिंग वर्क्स
- मालवाहतूक व्यवसाय
- डिजिटल प्रिंटिंग
- इलेकट्रीशन
- प्लम्बिंग
- व्हील अलाइनमेंट
- मंडप डेकोरेशन
- सलून
- ब्युटीपार्लर
- मळणी यंत्र
CMEGP Scheme ची प्रोसेस स्टेप बाय स्टेप (CMEGP Scheme process step by step)
- अर्जदाराने CMEGP च्या या वेबसाईट (CMEGP वेबसाईट) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील, कोणत्याही परिस्थिती इतर मार्गाने अर्ज करता येणार नाही.
- अर्ज प्राप्त झाल्यावर जिल्हास्तरीय समिती या अर्जाची पडताळणी करते व प्राथमिक पात्र अर्जदारांची निवड करते.
- जिल्हास्तरीय समिती पात्र अर्जदारांची यादी अर्जदारांनींच सुचवलेल्या बँकेकडे पाठवते.
- बँकेकडे पाठवलेल्या अर्जाची बँक पडताळणी करते आणि रिसर्व्ह बँकेच्या नियमानुसार कर्जासाठी पात्र आहे का ते तपासते. जर बँकेला वाटले कि प्रोजेक्ट मध्ये काही दुरुस्ती करावयाची असेल तर बँक असे अर्ज जिल्हास्तरीय समितीला परत पाठवते.
- बँक प्राथमिक मंजुरी देते व CMEGP पोर्टलवर लॉगिन करून कर्ज मंजुरी पात्र अपलोड करते.
- बँकेने मंजुरीपत्र अपलोड केल्यानंतर अर्जदाराला EDP Training साठी जिल्हा उद्योग केंद्राला संपर्क साधावा.
- आपली EDP Training पूर्ण झाल्यावर ट्रैनिंग चे प्रमाणपत्र बँकेत जमा करावे, ते प्रमाणपत्र बँक त्यांच्या लॉगिन आयडी मधून CMEGP च्या पोर्टलवर अपलोड करते.
- त्यानंतर बँक कर्ज वितरण करते व कर्ज वितरण झाल्यानंतर हि कर्ज वितरणाची माहिती CMEGP पोर्टलवर अपलोड करते व अनुदानाच्या रकमेची मागणी करते. अनुदान रकमेपेक्षा जास्त रक्कम वितरण केली असेल तरच अनुदांनसाठी क्लेम करता येतो.
- जिल्हास्तरीय समिती क्लेम ची पडताळणी करून हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने CMEGP cell मुंबई ला पाठवते जे बँकेला आपले अनुदान पाठवते.
- हि अनुदानाची रक्कम बँकेला प्राप्त झाल्यावर हि रक्कम बँक आपल्या कर्ज खात्याला अशी लिंक करते जेणेकरून आपल्याला या रकमेवरती व्याज लागत नाही.
- तीन वर्षानंतर आपल्ला प्रकल्प समाधानकारक चालू असेल आणि आपण आपले कर्ज व्यवस्थितरीत्या परतफेड करत असाल तर बँक हि अनुदानाची रक्कम आपल्या कर्ज खात्याला जमा करते.
- हि रक्कम जमा करण्यासाठी बँकेला जिल्हा उद्योग केंद्राची परवानगी घ्यावी लागेल.
- वरील सर्व प्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जाते व पूर्णपणे पारदर्शक असते.
CMEGP Scheme अंतर्गत मिळणाऱ्या बँक कर्जासंबंधी (cmegp loan details)
- कर्ज रक्कम : या योजनेमध्ये बँक सामान्य प्रवर्गातील अर्जदाराची ९०% पर्यंत कर्ज देते तर राखीव प्रवर्गातील अर्जदाराची ९५% पर्यंत कर्ज पुरवठा करते.
- कर्ज प्रकार : या योजनेअंतर्गत मुदत कर्ज व कॅश क्रेडिट या दोन्ही प्रकारात कर्ज पुरवठा केला जातो. अनुदान रक्कम प्रकल्पाच्या एकूण रकमेवर दिले जाते. परंतु कॅश क्रेडिट चा वापर पूर्णपणे झाला असेल तरच हि रक्कम अनुदानाला पात्र ठरवता येईल.
- व्याज दर : व्याज दर हे बँकेच्या नियमानुसार आकारले जातील.
- परतफेड कालावधी : परतफेड कालावधी सामान्यतः ३ ते ७ वर्षापर्यंत दिला जातो.
- लॉक इन कालावधी : आपले कर्ज कमीत कमी अनुदानाच्या लॉक इन कालावधी पर्यंत तरी सुरु ठेवने बंधनकारक असते.
CGTMSE : या कर्जाला बँकेकडून कोणतीही कोलॅटरल तारण मालमत्ता मागितली जात नाही परंतु आपले कर्ज CGTMSE खाली कव्हर करणे बंधनकारक आहे. CGTMSE बद्दल अधिक माहितीसाठी हा लेख नक्की वाचा (CGTMSE योजनेची थोडक्यात ओळख)
लोकसंखेचा निकष
२०११ च्या जनगणनेनुसार २०००० लोकसंख्या पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागाला ग्रामीण समजले जाते व २०,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भागाला शहरी समजले जाते व त्यानुसार अनुदानाची टक्केवारी ठरवली जाते. यासाठी आपल्याला आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाकडून लोकसंख्येचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते.
कागदपत्रे cmegp documents list
खालील कागदपत्रे या योजनेसाठी लागतात आणि ती कागपत्रे पोर्टलवर आपल्या लॉगिन मधून अपलोड करायची सुविधा दिलेली असते.
- पासपोर्ट साईझ फोटो
- आधार कार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
- हमी पत्र (Undertaking Form for CMEGP Scheme)
- प्रोजेक्ट रिपोर्ट
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- ट्रैनिंग प्रमाणपत्र (EDP Training Certificate)
- स्पेशल प्रवर्ग प्रमाणपत्र (दिव्यांग प्रमाणपत्र)
उद्योजगता विकास कार्यक्रम (Entrepreneurship Development Programme)
CMEGP Scheme अंतर्गत पात्र सर्व अर्जदारांना उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत ट्रैनिंग घेणे बंधनकारक असते. या ट्रैनिंग मध्ये व्यवसायासंबंधी काही महत्वाच्या गोष्टी शिकवल्या जातात जसे कि आर्थिक नियोजन, व्यवस्थापकीय कौशल्य, मार्केटिंग, अकाउंटिंग इ. EDP ट्रैनिंग चा कालावधी सेवा क्षेत्रातील प्रकल्पासाठी एक आठवड्याचा आहे व उत्पादन क्षेत्रातील प्रकल्पासाठी दोन आठवड्याचा आहे.
0 Comments